मुंबईत हायटाईडचा इशारा, सतर्क राहण्याचं पालिकेचं आवाहन

मुंबईत हायटाईडचा इशारा, सतर्क राहण्याचं पालिकेचं आवाहन

  • Share this:

cvb23556Mumbai-High-tide

15  जुलै :  मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. नवी मुंबई, ठाण्यातही पाऊस सुरू आहे. विलेपार्ले, दादर, वांद्रे इथं रिमझिम पाऊस सुरू आहे. कालच्या विश्रांतीनंतर आज मुंबईत पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबईत आज दुपारी 2 वाजून 28 मिनिटांनी 4.97 मीटर उंचीच्या हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आलेल्या कालच्या हायटाईडमध्ये मरीन ड्राईव्हवर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर समुद्रापासून दूर राहावे असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.

First published: July 15, 2014, 10:20 AM IST

ताज्या बातम्या