दीपक केसरकरांचा राष्ट्रवादीला रामराम, लवकरचं शिवसेनेत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2014 08:58 PM IST

दीपक केसरकरांचा राष्ट्रवादीला रामराम, लवकरचं शिवसेनेत

Kesarkar new

13  जुलै :  सिंधुदुर्गातल्या राणेंच्या दारुण पराभवाचे सूत्रधार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेत जाणार असल्याची घोषणा केली. येत्या आठ दिवसांत ते राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत घोषणा केली आहे.

ही लढाई नारायण राणे या व्यक्तीविरुद्ध नाही तर राणे या प्रवृत्तीच्या विरोधात आहे असं सांगत आपण राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेत आमदारकीसाठी उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, जनतेसाठी काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राणेंचा विरोध आणि कोकणाचा विकास हे माझं ध्येय असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी सोडताना केसरकरांनी शरद पवार आणि माजी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आघाडीमुळे शरद पवारांना नारायण राणेंच्या विरोधात भूमिका घेता येत नाही. आव्हाडांसारख्या उद्धट नेत्यांचं काय करायचं हे जनताच ठरवेल असं ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली. राजीनामा दिल्यानंतरही निलंबन होईल असं ते मला धमकावत होते असा आरोप केसरकरांनी केला आहे.

नारायण राणेंना टार्गेट करताना त्यांनी निलेश राणेंचा पराभव झाला तरी त्यांच्या प्रवृत्तीत बदल झालेला नाहीय, असं ते म्हणाले. सावंतवाडी माझा मतदारसंघ असेल आणि राणेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढून दाखवावी असं थेट आव्हान त्यांनी राणेंना दिलं आहे.

Loading...

लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यान रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध केसरकर असा संघर्ष उफाळला होता. याचाच जबरदस्त फटका राणेंना बसला आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत विजयी झाले. शिवसेनेच्या विजयाची पायाभरणी ही केसरकरांच्या राणेविरोधी आंदोलनामुळेच झाली. मात्र केसरकर यांनी राणेंचा विरोध केल्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यावर कारवाई केली होती. आता देशात मोदी लाट आहे आणि राज्यातही सत्ताबदलाचे दावे केले जात आहेत. संघर्षाच्या काळात पक्षाकडून साथ न मिळाल्यामुळे केसरकरांनी सेनेची वाट धरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2014 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...