नेदरलँडचा खेळ खल्लास, अर्जेंटिना-जर्मनी फायनलमध्ये भिडणार

नेदरलँडचा खेळ खल्लास, अर्जेंटिना-जर्मनी फायनलमध्ये भिडणार

  • Share this:

romero10  जुलै : साओ पाओलोमध्ये रंगलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या दुसर्‍या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनानं नेदरलँडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला. त्यामुळे फायनलमध्ये जर्मनी विरुद्ध अर्जेंटिना अशी लढत पाहायाला मिळणार आहे. तब्बल 24 वर्षांनी अर्जेंटिनानं फायनलमध्ये धडक मारली आहे.

फुटबॉल वर्ल्ड कपच्या दुसर्‍या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1.30 वाजता मॅच सुरू झाली. जर्मनीनं ब्राझीलचा केलेल्या दारुण पराभवाचे पडसाद या सेमीफायनलमध्येही दिसले. त्यामुळे दोन्ही टीम्सने सुरुवातीपासूनच सावध खेळ केला. निर्धारित वेळेत दोन्ही टीमला एकही गोल करण्यात अपयश आल्याने अतिरिक्त अर्धातास देण्यात आला. मात्र त्यातही दोन्ही टीमला गोल करता आला नाही. शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये मॅचचा निकाल लागला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलकिपर रोमेरोने उत्कृष्ट बचाव करत टीमला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिलं. रोमेरोने नेदरलँडच्या व्लार आणि वेसली स्नायडर या दोघांनी मारलेल्या किकवर उत्कृष्ट बचाव करत अर्जेंटिनाला विजयी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाच्या मेस्सीने संघाला पहिल्याच किकमध्ये यश मिळून दिलं यानंतर अर्जेंटिनाच्या मॅक्सी रॉड्रीग्जने चौथी आणि निर्णयक किकवर गोल मारला. पेनल्टी शूट आऊटमध्ये नेदरलँडला फक्त दोनचं गोल करता आले. तर अर्जेंटिनाने चारही किकवर गोल मारल्याने नेदरलँडचा 4-2ने पराभव करत फायनल्समध्ये धडक मारली. आता फायनलमध्ये अर्जेंटिना विरुद्ध जर्मनी असा सामना रंगणार असून कोण फिफाचं जेतेपद मिळावणार याचीच सर्वांना उत्सूक्ता लागली आहे.

First published: July 10, 2014, 10:18 AM IST

ताज्या बातम्या