नेतृत्वबदलाचा विषय संपला, मुख्यमंत्री गटाचा दावा

नेतृत्वबदलाचा विषय संपला, मुख्यमंत्री गटाचा दावा

  • Share this:

cm and manikrao09 जुलै : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला उधाण आलं होतं. आता मात्र हा विषय आता संपला आहे असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाने केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज (बुधवारी) संध्याकाळी दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची 10 जनपथ इथं भेट घेतली. सोनिया गांधींसोबत मुख्यमंत्र्यांची पाऊण तास चर्चा झाली. राज्यातल्या राजकीय परिस्थितीविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली. ऍन्टोनी समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने ही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी आज आपलं नियोजित दैनंदिन कामकाज अर्धवट सोडून थेट दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला सुरुवात झाली होती.

दरम्यान, नेतृत्व बदलाबाबत नुसती चर्चाच सुरू आहे, निष्पन्न काहीच होत नाही. चेहरा जाहीर झाल्यावर बोलता येईल अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. ते कणकवलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. मी मुख्यमंत्री एकदा झालोय. पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर त्याची खंत नाही काही जणांच्या राशीत नुसत्या चर्चेतच नाव असंही मिश्किल टिप्पणीही राणे यांनी केली. तसंच काँग्रेस स्वबळावर लढल्यास सत्ता आणू शकते असा दावाही राणेंनी केलाय.

First published: July 9, 2014, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading