सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाईंचं नाव द्या -आठवले

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाईंचं नाव द्या -आठवले

  • Share this:

ramdas athavale on joshi08 जुलै : पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने दोनच दिवसांपुर्वी घेतला आता त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

अहिल्याबाईंचं कार्य सगळ्यांना माहित आहे त्यांची कारकीर्द खूप मोलाची आहे. त्यामुळेचं त्यांचं नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यात यावं असं आठवले म्हणाले. तर राज्यात पुण्याप्रमाणेच आणखी 3 विद्यापीठांच्या नामांतराचा प्रस्ताव आहे.

त्यात जळगाव विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव आला असून त्यावर विचार सुरू आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

First published: July 9, 2014, 1:39 PM IST

ताज्या बातम्या