मुंबईत पाणीकपात वाढणार ?

मुंबईत पाणीकपात वाढणार ?

  • Share this:

Image img_139992_pani53_240x180.jpg09 जुलै : मुंबईत उशिरा का होईना पावसाने हजेरी जरी लावली असली तरी मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कायम आहे. त्यात महापालिका पाणी कपातीचं प्रमाण वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत पुढच्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईसह राज्यात थोडाफार जो पाऊस होत आहे तो पाण्याच्या साठ्यासाठी पुरेसा नाही. तसंच पालिकेचे कर्मचारी आणि सत्ताधारी पक्षांनी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विशेष काही पसंती दाखवत नसल्याने, मुंबईवर पाणीसंकट वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत मागच्या आठवड्यापासून वीस टक्के पाणीकपात सुरू केली आहे. मुंबईतील तलावांमध्ये फक्त 21 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. वाढीव पाणी कपात अद्याप निश्चित नसून पुढच्या आठवड्यात याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2014 01:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading