उस्मानाबादमध्ये फटाका कारखान्यांवर वीज कोसळून 8 ठार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2014 10:09 PM IST

Image img_70892_usmanabad_240x180.jpg08 जुलै : उस्मानाबादमध्ये कळंब येथील तेरखेडा गावात दोन फटाका कंपनीवर वीज कोसळल्यामुळे मोठा अपघात घडलाय. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी आहे.

तेरखेडा येथील वेलकम फायर वर्क्स आणि प्रिन्स फायर वर्क्स या कारखान्यांवर वीज कोसळ्यामुळे कारखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. यावेळी फट्याकांचा स्फोटही झाला असंही कळतंय.

स्फोट झाल्यामुळे आठ मजुरांचा मृत्यू झाला. आणखीही काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2014 10:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...