S M L

मेस्सी मॅजिकमय अर्जेंटिना आणि नेदरलँडमध्ये कडवी झुंज

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2014 12:05 PM IST

मेस्सी मॅजिकमय अर्जेंटिना आणि नेदरलँडमध्ये कडवी झुंज

 

08 जुलै : फिफा वर्ल्ड कपच्या दुसर्‍या सेमीफायनलमध्ये एक लॅटिन अमेरिकेची फेव्हरेट तर दुसरी युरोपियन फेव्हरेट टीम आमने सामने येणार आहेत. या सेमीफायनलमध्ये अर्जेंटिनाचा मुकाबला असणार आहे तो हॉलंडशी. 9 जुलैला साओ पाओलोच्या स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता ही मॅच सुरू होईल. या संपूर्ण स्पर्धेत अर्जेंटिना एक फेव्हरेट टीम म्हणून समोर आली आहे.

प्रत्येक मॅचमध्ये त्यांचा स्टार प्लेअर लायोनेल मेस्सीचा धडाका बघायला मिळाला आहे. फक्त गोल्संच नाही तर मेस्सीने अप्रतिम असिस्ट करत टीमला महत्वाच्या मॅचमध्ये विजय मिळवून दिला होता. मेस्सीच्या याच तुफान कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिना आतापर्यंत अपराजित राहिली आहे. त्यामुळे मेस्सीची जादू अशीच बघायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


तर या संपूर्ण स्पर्धेत हॉलंडनंही आपला धडाका दाखवला आहे. ग्रुप स्टेजपासून हॉलंडने सगळ्या मॅच अगदी दिमाखात जिंकले आहेत. रॉबीन व्हॅन पर्सी, आर्जेन रॉबेन आणि वेस्ली स्नायडरच्या धडाक्यावर हॉलंडने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला एवढचं नाही तर क्वार्टर फायनलमध्ये कोस्टा रिकाचा त्यांनी पेनल्टी शूट आऊटमध्ये धुव्वा उडवला होता. त्यामुळे अर्जेंटिनासाठी हॉलंडचं आव्हान नक्कीच सोपं नसणार आहे.

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2014 12:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close