होऊन जाऊ दे, ब्राझील-जर्मनी आज भिडणार !

होऊन जाऊ दे, ब्राझील-जर्मनी आज भिडणार !

  • Share this:

Brazil and germany08 जुलै : फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये फुटबॉल जगतातले दोन जायंट्स आज एकमेकांना भिडणार आहेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये यजमान ब्राझीलला आव्हान आहे ते जर्मनीचं. भारतीय वेळेनुसार आज रात्री 12.30 वाजता बेलो हॉरिझाँटेच्या स्टेडिओ मिनेरिओवर ही मॅच रंगणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत ब्राझीलने एकही मॅच गमावली नाहीये. प्रत्येक मॅचमध्ये ब्राझीलने धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये वर्चस्वाची लढाई रंगेल यात काही शंका नाही आहे.

पण त्यातच त्यांना दोन धक्केही बसले आहे. एकीकडे त्यांचा स्टार प्लेअर न्येमार दुखापतीमुळे उर्वरित वर्ल्ड कपला मुकणार आहेत तर दुसरीकडे त्यांचे कॅप्टन थिऍगो सिल्वाला दोन यलो कार्ड मिळाल्याने सेमी फायनलची मॅच मुकावी लागेल. त्यामुळे ब्राझीलसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.

तर आतापर्यंतच्या संपूर्ण स्पर्धेत जर्मनीने गोल्सचा धडाका करत आणि प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत आपली दहशत निर्माण केली आहे. म्युलर, क्लोज, श्वान्स्टाईगर, ओझील यांच्या धडाकेबाजी खेळामुळे जर्मन टीमला इथपर्यंत पोहचली. जर्मन टीम गेल्या तीन वर्ल्ड कपमध्ये कमालीची कामगिरी करत आहे. पण त्यांना विजयाने नेहमी हुलकावणी दिली आहे. पण आता या मोक्याच्या क्षणी जर्मन टीम आपला दणका दाखवते, की इतिहासाची पुनरावृत्ती होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

First published: July 8, 2014, 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading