तृतीयपंथीयावर सामुहिक बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल : आयबीएन लोकमत इम्पॅक्ट

24 एप्रिलमुंबईत अमेरिकन महिलेवर झालेला सामुहिक बलात्काराचा खटला गाजत असतानाच विरारमध्ये एका तृतीयपंथीयावर सामुहिक बलात्कार झाल्याच्या आरोपाची बातमी आयबीएन लोकमतने सकाळपासून दाखवली. त्यानंतर याप्रकरणी विरार पोलिसांनी पाच जणांवर कलम 377 खाली अनैसर्गिक संभोगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सकाळपासून एकच खळबळ उडाली आहे. जोगता असलेल्या 18 वर्षांच्या तृतीयपंथीयावर तीन पुरुषांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप इथल्या तृतीयपंथीयानी केला आहे. या प्रकरणात हाजी गफूर आणि मुकीम अहमद नावाच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पण बलात्कार झाल्याचे पुरावे मिळवण्यासाठी आवश्यक असलेली प्रोक्टोस्कोप ही ऍनल टेस्ट मात्र अद्याप करण्यात आली नाहीय. संबंधित तृतीयपंथीयाला आता भगवती हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. बलात्कार होऊन आता 42 तास उलटून गेल्यानंतर विरार पोलिसांनी ही कारवाई सुरु केल्याचं समजतंय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2009 09:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading