मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टांगती तलवार ?

मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टांगती तलवार ?

  • Share this:

565cm_maharashtra07 जुलै : महाराष्ट्रात नेतृत्त्व बदलाच्या चर्चेने पुन्हा जोर पकडलाय. ऐ.के. अँटोनी समितीच्या रिपोर्टनंतर आता पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी नेतृत्त्वबदलासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेणार असल्याचं समजतंय. याच आठवड्यात नेतृत्त्व बदल होण्याची चर्चा जोरात सुरू आहे. मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांनी आयबीएन लोकमतला यासंदर्भात माहिती दिलीय. लोकसभेत राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राज्यात काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातूनच मुख्यमंत्री हटवण्यात यावे अशी मागणी झाली होती. पण काँग्रेस हायकमांडने ही मागणी फेटाळून लावली.

विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीकडूनही मुख्यमंत्री बदलण्यात यावा असा आग्रह होता पण तरीही मागील आठवड्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून अभय मिळाला. पण अँटोनी समितीने आपला अहवाल आता पक्षाध्यक्षांकडे मांडणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टांगती तलवार कायम आहे.

First published: July 7, 2014, 10:23 PM IST

ताज्या बातम्या