'मी, पंकजा गोपीनाथ मुंडे'

  • Share this:

pankaja_munde_palwe07 जुलै : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मंुडे यांची मुलगी पंकजा मुंडे-पालवे यांनी आजपासून आपलं नाव पंकजा गोपीनाथ मुंडे असं लिहिणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर याबद्दल माहिती जाहीर केली.

ज्या नावानं अवघा महाराष्ट्र गाजवला, सामान्य राजकारणात अढळ स्थान निर्माण केलं अशा गोपीनाथ मुंडेंचं नाव लिहिण्याचा निर्णय मी घेतलाय.

अनेक पत्रं, अनेक प्रस्ताव, अनेक संस्थाशी संबंधित कागदपत्रांवर त्यांनी सही केली आणि त्या सहीने कैक जणांची घरं वसवली, कित्येक भविष्यं घडवली ते नाव मी रोज लिहिणार असा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

First published: July 7, 2014, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading