मुंबई बाजार समितीचं दिनदर्शिकेचं गणित चुकलं

मुंबई बाजार समितीचं दिनदर्शिकेचं गणित चुकलं

  • Share this:

शैलैश तवटे, नवीमुंबई

07  जुलै : मुंबई बाजार समिती आता आणखी एका वादात सापडली आहे. वार्षिक दैनंदिनी आणि दिनदर्शिका छपाईमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे.

मंुबई कृषी उत्पन्न बाजार समितीने 2013 आणि 2014 या वर्षांसाठी वार्षिक पाच हजार दैनंदिनी आणि दिनदर्शिका छापल्या होत्या. पण, यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर येतं आहे. या कामासाठी 2 वर्षात मागवण्यात आलेल्या निविदांमध्ये बाजारभावापेक्षा जास्त पटीने खर्च लावल्याचा आरोप मनसेच्या गजाजन काळे यांनी केला आहे

बाजारमूल्यापेक्षा 100 पटीने असलेल्या निविदा मंजूरही करण्यात आल्या. त्यामुळे बाजार समितीचं तब्बल 61 लाख रुपयांचं नुकसान संचालक मंडळाने केल्याचं उघड झालं आहे. मात्र यावर संचालक मंडळाने कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे आता तरी सरकार या संदर्भात चौकशी करून कारवाई करेल का, हेच पाहावं लागेल.

First published: July 7, 2014, 4:42 PM IST

ताज्या बातम्या