पल्लवीच्या मारेकर्‍याला मरेपर्यंत जन्मठेप

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2014 04:12 PM IST

121pallavi purkayastha07 जुलै : पल्लवी पुरकायस्थ खून प्रकरणी आरोपी सुरक्षारक्षक सज्जाद पठाणला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. खून, विनयभंग आणि जबरदस्तीने घरात घुसल्याबद्दल सज्जादला शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणाची आज (सोमवारी) अंतिम सुनावणी मुंबई सेशन्स कोर्टात झाली. पल्लवीच्या कुटुंबीयांनी कोर्टाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलंय.

मागील आठवड्यात सेशन्स कोर्टाने सज्जादला या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. 9 ऑगस्ट 2012 रोजी मुंबईतील वडाळा इथं राहणार्‍या पल्लवीची राहत्या घरी हत्या झाली होती.

इमारतीचा सुरक्षारक्षक सज्जाद अहमद पठाणने पल्लवीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण पल्लवीने प्रतिकार केल्यामुळे पठाणने तिची हत्या केली होती.

अखेर दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पल्लवीच्या मारेकर्‍यांना शिक्षा सुनावण्यात आलीय. कोर्टाच्या या निर्णयावर पुरकायस्थ कटुंबीयांनी समाधान व्यक्त केलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2014 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...