'राज'गर्जनेनंतर मनसेत 'वसंत' फुलला

'राज'गर्जनेनंतर मनसेत 'वसंत' फुलला

  • Share this:

vasant_gite07 जुलै : लोकसभेत दारुण पराभवानंतर मनसेनं नव्याने इंजिन स्टार्ट करत विधानसभेच्या तयारीला लागलीय. यासाठी खुद्द राज ठाकरे आता मैदानात उतरणार आहे. पण नाशिकच्या 'गडा'वर शिलेदारांनी नाराजीचे 'गीत' गायल्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली. अखेर हे नाराजीनाट्य आता संपलंय असं सांगण्यात आलंय.

लोकसभेच्या पराभवातून सावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेच्या कामाला लागले. राज ठाकरे ठरल्याप्रमाणे दर महिन्याला नाशिकच्या दौर्‍यावर आले. मात्र राज यांनी बोलावलेल्या बैठकीला मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते आणि अतुल चांडक गैरहजर राहिले. त्यामुळे वसंत गीते आणि अतुल चांडक नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचं खापर नाशिकच्या पदाधिकार्‍यांवर फोडण्यात आलं. त्यानंतर डॅमेज कंट्रोल म्हणून शहराध्यक्ष बदलण्यात आले, संपर्कप्रमुख नेमण्यात आले. या सार्‍यात वसंत गीते बाजुला पडले होते. त्यामुळे गीतेंनी नाराजीचे बंड पुकारले. मात्र या नाराजी नाट्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न झालाय.

मुंबईहून आलेल्या नेत्यांच्या मध्यस्थीनंतर गीतेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. आपण नाराज नसल्याचं गीतेंनी स्पष्ट केलंय. मात्र याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईला बैठक होणार आहे. नाशिक मनसेतल्या पक्षसंघटनेत गेल्या काही दिवसापासून धुसफूस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या दौर्‍यात प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांची अनुपस्थिती महत्त्वाचा विषय ठरली. त्यानंतर प्रदेश सरचिटणीस आणि आमदार नितीन सरदेसाई आणि दिपक पायगुडे मुंबईहून खास मध्यस्थीसाठी आले. त्यानंतर गीते राज ठाकरेंच्या भेटीला गेले. दरम्यान, आपण नाराज नसल्याचं गीतेंनी माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केलं. या नाराजीनाट्यामुळे ठाकरेंनी त्यांचा दौरा आटोपता घेतला आणि ते मुंबईला गेले.

First published: July 7, 2014, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading