06 जुलै : डॉक्टरांच्या संपामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत असताना संपकारी डॉक्टरांवर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. राज्यातील 265 कंत्राटी डॉक्टरांना राज्य सरकारने निलंबित केले असून डॉक्टरांवर मेस्माअंतर्गत स्थिनिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कार असा आदेश राज्य सरकारने दिला आहेत. तर दुसरीकडे मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांचंकामबंद आंदोलन सुरूच राहणार असं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारशी आपली कोणतीही चर्चा झाली नाही त्यामुळे आंदोलन सुरूच ठेवणार असं संपकरी डॉक्टरांनी सांगितलं आहे.
संपकरी डॉक्टरांवर मेस्माअंतर्गत कारवाई करणार अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. या कारवाईनंतर कंत्राटी रिक्त जागा भरण्यासाठी विभागीय पातळीवर प्रक्रियाही लगेच सुरू करू असा इशारा सुरेश शेट्टी यांनी दिला आहे. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि कॅबिनेट सचिव यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांशी चर्चेसाठी तयार आहोत मात्र संपकरी डॉक्टरांच्या आठमुठ्या धोरणामुळे आंदोलन चिघळतंय असा आरोपही शेट्टी यांनी केला आहे.
मुंबई, पुणे, औरंगाबादसह राज्यभर आजही गॅझेटेड डॉक्टर संपावर आहेत. मंगळवारपासून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. आझाद मैदानात डॉक्टरांनी ठिय्या मांडला आहे. तर पुण्यातल्या औंध सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मानवी साखळी करून आंदोलन केलं. मॅग्मोच्या 11 हजार 800 वैद्यकीय अधिकार्यांनी आरोग्य मंत्रालयाकडे आपले राजीनामे दिले आहेत.दरम्यान, कासा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाला गावकर्यांनी कुलूप ठोकलं आहे. डॉक्टरांच्या संपामुळे संतप्त गावकर्यांनी कासा पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Follow @ibnlokmattv |
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा