06 जुलै : रायगड जिल्ह्यातल्या मुरुडच्या समुद्रात बुडून 6 पर्यटकांचा आज (रविवारी) मृत्यू झाला आहे.
सर्व पर्यटक मुंबईतल्या चेंबूरचे रहिवासी आहेत. समुद्रात कोणीही पोहायला जाऊ नये अशी धोक्याची सूचना जिल्हा प्रशासनानं दिली होती, तरीही हे 6 जण पोहायला गेले. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. दिनेश पवार, दिलीप गोळे, संजय पांचाळ, शंकर चव्हाण, विनोद अलय, रोहित अशी या मुलांची नावं आहेत. स्थानिकांच्या मदतीनं या सर्वांचे मृतदेह शोधण्यात आले.
Follow @ibnlokmattv |