राष्ट्रवादीला का हव्यात 144 जागा ?

  • Share this:

35pawar_cm_ncp05 जुलै : लोकसभेत दारुण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केलीय. 144 जागा मिळाल्या नाहीत तर 288 जागा लढवण्याची तयारी ठेवा, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं. पण राष्ट्रवादीने ही मागणी का केली हे ही महत्वाचं आहे.

2009 मध्ये काँग्रेसने 174 जागा आणि राष्ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 82 जागा  काँग्रेसने आणि 62 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. 2014 ला राष्ट्रवादीने 144 जागांची मागणी केलीय. म्हणजे तब्बल 30 जागा जास्त हव्या आहेत.

जागावाटपाच्या निकषासाठी 2014 च्या लोकसभेच्या निकालाचा आधार घ्यावा,अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीला 4 आणि काँग्रेसला 2 जागा जिंकता आल्या. याचा अर्थ राष्ट्रवादीला दुप्पट जागा जास्त मिळाल्या.

या शिवाय, राष्ट्रवादीला 27 आणि काँग्रेसला 13 विधानसभा मतदार क्षेत्रांमध्ये क्रमांक एकचे मताधिक्य मिळाले. याचा अर्थ राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा दुपटीने म्हणजे 14 मतदारक्षेत्रांमध्ये मताधिक्य मिळाले आहे. या शिवाय, 2009च्या विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार क्रमांक तीनवर फेकला गेला, अशा काही सोयीच्या जागांची मागणी राष्ट्रवादी करू शकते.

 

2009 विधानसभा निवडणूक

                    

  • काँग्रेस - 174
  • राष्ट्रवादी- 114

जागा जिंकल्या

  • काँग्रेस - 82
  • राष्ट्रवादी-62

जागावाटपाचा निकष कोणता ?

 

2014 लोकसभा निवडणुकीत जागा जिंकल्या 

  • काँग्रेस 02
  • राष्ट्रवादी 04

विधानसभा मतदारसंघामध्ये क्रमांक एकचे मताधिक्य

  • काँग्रेस 13
  • राष्ट्रवादी 27

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2014 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading