'आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार'

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2014 10:00 PM IST

'आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार'

3thorat_on_ajit_pawar05 जुलै : एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार आघाडी उघडलीय. थेट स्वबळावर लढण्याचा इशाराच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलाय. तर काँग्रेसनंही राष्ट्रवादीच्या या पवित्र्याला जशास तसं उत्तर दिलंय.

आम्ही आघाडीचा धर्म मानतो, पण गरज पडली तर काँग्रेसचीही सर्व जागा लढवण्याची तयारी आहे प्रत्युत्तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना दिलंय.

तर जागावाटपाचा निर्णय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेतात असं स्पष्टीकरणही वनमंत्री पतंगराव कदम यांनी केलं.

जागावाटपावर कुणी काही म्हटलं तर त्याबद्दल काही बोलण्यासारखं नाही. हा निर्णय दोन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठची घेतील असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2014 10:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close