थरार क्वार्टर फायनलचा...

थरार क्वार्टर फायनलचा...

  • Share this:

fifa

04  जुलै : राऊंड ऑफ 16 ची धूम आता संपली आहे आणि आता क्वार्टर फायनलचा थरार सुरू होणार आहे. पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये ऑल युरोपियन मॅच रंगणार आहे. आज पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये युरोपियन जायंट फ्रान्सला आव्हान आहे ते वर्ल्ड कपमधील सातत्यपूर्ण टीम जर्मनीचं. रिओ डि जिनेरोच्या स्टेडिओ मॅराकानावर भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता ही मॅच रंगणार आहे तर दुसर्‍या क्वार्टर फायनलमध्ये यजमान ब्राझीलचा मुकाबला रंगणार आहे. त्यामुळे या मॅचकडे सगळ्यांच लक्ष असेल. पहिली मॅच दोन युरोपियन जायंट्समध्ये होईल तर दुसर्‍या मॅचमध्ये दोन लॅटिन अमेरिकेच्या टीम एकमेकांना भिडतील. दुसर्‍या क्वार्टरफायनलमध्ये ब्राझीलला आव्हान आहे ते कोलंबियाचं. फॉर्टालिझाच्या स्टेडिओ कॅस्टेलिओवर भारतीय वेळेनुसार रात्री 1.30 वाजता ही मॅच रंगणार आहे.

First published: July 4, 2014, 10:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading