मुंबईत गुरूवारपासून 20 टक्के पाणीकपात

मुंबईत गुरूवारपासून 20 टक्के पाणीकपात

  • Share this:

water shortage rap

02  जुलै :  मुंबईत मान्सूनने आगमन केले असले तरी उद्यापासून मुंबईत 20 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यंदा मान्सून तब्बल महिनाभर उशिराने मुंबईत दाखल झाला आहे. मान्सूनने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये 30 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने अखेर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये आजपासून पाणीकपात होणार असल्याचे संकेत मिळत होते.

महाराष्ट्रात मान्सून सक्रीय व्हायला आजून आठवडाभराचा वेळ लागेल असं मुंबई हवामान विभागाच्या डायरेक्टर शुभांगी भुते यांनी सांगितलं. त्यामुळे आज मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी या आठवडाभरात अपेक्षित पाऊस न पडल्यास पाणीकपात आणखी वाढवण्यात येईल अशी चर्चा आहे.

First published: July 2, 2014, 6:07 PM IST

ताज्या बातम्या