S M L

BMCची दुरवस्था उघड, पहिल्याच पावसात मुंबईची 'लाईफलाईन' विस्कळीत

Samruddha Bhambure | Updated On: Jul 2, 2014 02:50 PM IST

BMCची दुरवस्था उघड, पहिल्याच पावसात मुंबईची 'लाईफलाईन' विस्कळीत

02  जुलै :  जुलै महिन्यापर्यंत वाट बघायला लावणार्‍या पावसाने अखेर आज दमदार हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला खरा, पण रेल्वे रुळांवर आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे. या पावसामुळे सकाळी कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि कुर्ला स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल 20-25 मिनिटं उशिराने धावत आहेत तर वडाळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर लाईनही विस्कळीत आहे. सिग्नल यंत्रणा सुरू होत नाही तोवर मानखुर्दपासून सीएसटीकडे जाणार्‍या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

पहिल्याच पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाल्यामुळे मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. घाटकोपरला नाला फुटल्यामुळे 1 किमीपर्यंत पाणी तुंबले आहे. भांडुपच्या एलबीएस रोडवर सोनापूरजवळ नाले तुडुंब भरल्याने रस्त्यांवर पाणी साचलं आहे. एलबीएस रोडवर ट्रॅफिक जाम झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती सांताक्रुझ येथेही अशीच परिस्थिती असल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2014 02:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close