मुंबईसह उपनगरांत पावसाची जोरदार हजेरी

मुंबईसह उपनगरांत पावसाची जोरदार हजेरी

  • Share this:

Rain

02  जुलै :  असह्य उकाड्यातून हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात आज (बुधवारी) सकाळ पासून मुसळधार पाऊस झाला. सकाळी 11 पर्यत सांताक्रूझ इथं 105 मिमि पावसाची नोंद झाली, तर कुलाबा भाग अजून कोरडाच आहे. मुंबई शहरात 21.9 मिमी पाऊस, पूर्व उपनगरांमध्ये 82.6 मिमी तर पश्चिम उपनगरांत 82.5 मिमी पाऊस

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार्‍या मान्सूनने राज्याकडे पाठ फिरवली होती. मात्र काल रात्रीपासून मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतही पाऊस सुरू आहे. रायगड, रोहा, महाडमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावलीये.आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली असली तरी मुळातच पाऊस लांबल्यानं मुंबईकरांवर आजपासून पाणीकपातीची टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक मंदावली आहे तर हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे.

First published: July 2, 2014, 1:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading