महाराष्ट्रात 'आप'ने विधानसभा लढवू नये - अरविंद केजरीवाल

महाराष्ट्रात 'आप'ने विधानसभा लढवू नये - अरविंद केजरीवाल

  • Share this:

IN08_KEJRIWAL_1713960fमहाराष्ट्रात 'आप'ने विधानसभा लढवू नये असं मत आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी नुकतंच गुगल हँगआउटवरून जनतेशी संवाद साधला. यात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. पण, राज्य कार्यकारिणीशी चर्चा करून मगच निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं . लोकसभेतला दारुण पराभव आणि आगामी दिल्ली निवडणुका या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या वक्तव्याला महत्त्व आलं आहे. दिल्लीत गमावलेली सत्ता परत मिळवणं, हे आपसमोर मोठं आव्हान आहे. त्यादृष्टीने आता पक्षाचे प्रयत्नही सुरू झालेत.

First published: July 1, 2014, 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading