धरणांतलं पाणी फक्त पिण्यासाठी वापरा -अजित पवार

धरणांतलं पाणी फक्त पिण्यासाठी वापरा -अजित पवार

  • Share this:

ajit pawar on munde30 जून : राज्यात पावसानं ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.

राज्यातल्या धरणांमधला साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यावर गेलाय. त्यामुळे सर्व धरणांमधलं पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

सध्या राज्यातल्या पेरण्या शून्य टक्क्यांखाली आल्या आहेत. पाण्याविषयी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

तसंच तहसिलदारांना पाण्याविषयीचे अधिकार देण्याचा निर्णय लागू राहील, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच दुबार पेरणी करावी लागेल का याचा आढावा घेण्याचं कामही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

First published: June 30, 2014, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading