ऑस्ट्रेलियन ओपनची चॅम्पियन सायना नेहवाल

ऑस्ट्रेलियन ओपनची चॅम्पियन सायना नेहवाल

  • Share this:

sayana nehwal29  जून : भारताची वंडरगर्ल सायना नेहवालनं स्वत:च्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन सुुपरसीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरित चॅम्पियनशिपवर आपलं नाव नोंदवलं. अंतिम फेरीत सायनासोमर स्पेनच्या कॅरोलिन मेरिन हिचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा 21-18, 21-11 असा पराभव करत तिनं ही स्पर्धा जिंकली.

दुसर्‍या गेमच्या सुरुवातीला सायना थोडीशी अडखळली होती. पण लवकरच स्वत:ला सावरत तिनं गेम आणि स्पर्धा खिशात टाकली. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सायनाला सहावं मानांकन मिळालं होतं. चॅम्पियनशिपसोबतचं सायनाला साडेसात लाख डॉलर्सचं बक्षीसही देण्यात आलं आहे.

First published: June 29, 2014, 5:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading