मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2014 12:57 PM IST

मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण

 

maratha_aarakashan24 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने अखेर आरक्षणाचा निर्णय मार्गी लावला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या आरक्षणाला राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मराठा समाजासह मुस्लीम समाजाला आरक्षणास मंजुरी देण्यात आलीय. मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. राणे समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्ग मानून 16 टक्के आरक्षण देण्यात आलंय. तर मेहमद्दूर रेहमान यांच्या अभ्यासगटाच्या शिफारसीनुसार मुस्लिमांना 5 टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्यात आलं असून हे आरक्षण शैक्षणिक आणि नोकर्‍यांमध्ये देण्यात येणार आहे. पण आरक्षण क्रिमी लेअर म्हणजेच श्रीमंत मुस्लिमांना असणार नाही. मुस्लिमांना धार्मिक पार्श्वभूमीवर आरक्षण दिलेलं नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच आरक्षणाचं प्रकरण कोर्टात गेल्यास-कायदेशीर बाबींना तोंड देण्यास राज्य सरकार तयार असल्याचंही मुख्यमंत्री सांगितलं. तर गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न रखडलेला होता म्हणून निर्णय घेण्यात आला याचा आणि निवडणुकाचा काहीही संबंध नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

सध्या राज्यात 52 टक्के आरक्षण आहे. आजचे नवे आरक्षण धरुन 73 टक्क्यांवर आरक्षण झालं आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेलं 16 टक्के आरक्षण कोर्टासमोर टिकणार का हा सर्वात मोठ्ठा प्रश्न आहे. कारण आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाच्या मुद्दयावर हे आरक्षण दिलेलं आहे.

त्यामुळे राज्य सरकारची कोर्टात खरी कसोटी लागणार आहे.

Loading...

तर भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीच्या निर्णयावर टीका केली. आज जाहीर केलेलं आरक्षण हा फक्त आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांवर डोळा ठेवून घेतलेला निर्णय आहे. धार्मिक पार्श्वभूमीवर आरक्षण देणं हे राज्यघटनाविरोधी आहे. मुस्लिमांना दिलेलं आरक्षण हे कायदेशीर पातळीवर टिकणार नाही. सरकार मुस्लिमांची दिशाभूल करतंय. हे फक्त मतांसाठीचं राजकारण आहे अशी टीका फडणवीस यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2014 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...