फुटबॉलच्या मैदानावर सुटला 'ड्रॅक्युला' !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2014 06:53 PM IST

फुटबॉलच्या मैदानावर सुटला 'ड्रॅक्युला' !

[wzslider height="700"]

26 जून : फुटबॉलच्या मैदानावर काय घडू शकतं आणि काय घडू शकत नाही याच जिवंत उदाहरण उरुग्वे आणि इटलीच्या मॅचमध्ये पाहण्यास मिळालं. त्याचं झालं असं की, 'करो या मरो' च्या मॅचमध्ये 80 मिनिटांपर्यंत गोलच होत नव्हता. दोन्ही टीमच्या स्टार खेळाडूंनी जीवाची बाजी लावली पण दोन्हींकडून 'इटका जवाब पथर से' असंच सुरू होतं.

उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेझ आणि इटलीचा खेळाडू जॉर्जियो चिल्लिनी यांच्यात बॉलवर ताबा मिळवण्यासाठी झटापट सुरू होती पण अचानक स्ट्रायकर लुईसला काय झाले काय कुणास ठाऊक याने थेट जॉर्जियो चिल्लिनीच्या खांद्याचा चावाच घेतला. फुटबॉलला काळिमा फासणारी अशी ही घटना कोट्यावधी फुटबॉल प्रेमींनी पाहिली आणि संतापही व्यक्त केला.

पण या चावर्‍या लुईसचीही ही काही पहिलीच वेळ नव्हती या अगोदरही त्याने दोन वेळा असाच पराक्रम गाजवला होता. त्याचा अशा वागण्यामुळे त्याला 'कॅनिबल ऑफ आएक्स' असंही म्हणतात. जानेवारी 2011 ला जेव्हा स्वॉरेझ लिव्हरपूल क्लबसोबत खेळायला लागला तेव्हा त्याच्यावर सात मॅचची बंदी होती. कारण PSV एन्डोवेनच्या मिडफिल्डर ऑटमन बक्कलला तो चावला होता. यानंतर डच पेपर्सनं त्याला मांसाहारी ही पदवी बहाल केली होती.

दुसर्‍यांदा स्वॉरेझ चावला तो 2013 मध्ये. प्रिमिअर लीग मॅचदरम्यान एप्रिल 2013 ला चेल्सीचा डिफेंडर ब्रॅनिस्लाव इव्हानोविकचा त्यानं चावा घेतला. या कृत्यासाठी त्याच्यावर 10 मॅचची बंदी घातली गेली. तर आता तिसर्‍यांदा पुन्हा एकदा त्यानं तोच प्रकार केलाय. ब्राझील वर्ल्ड कपमध्ये इटली विरुद्धच्या मॅचमध्ये इटलीचा मिडफिल्डर शिलीनीचा त्यानं चावा घेतलाय. आता यानंतर त्याच्यावर काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2014 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...