उरुग्वेचा निसटता विजय, इटली वर्ल्ड कप बाहेर

उरुग्वेचा निसटता विजय, इटली वर्ल्ड कप बाहेर

  • Share this:

italy vs uruguay25 जून : नॉकआऊट फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी 'करो या मरो'च्या सामन्यातून अखेर इटलीला बाहेरचा रस्ता धरावा लागला.'ग्रुप ऑफ डेथ मदील' या मॅचमध्ये 4 वेळचा चॅम्पियन इटली बाहेर पडलीय. मॅच संपायला अवघे 10 मिनिटं शिल्लक असताना उरुग्वेच्या दिएगो गॉडीननं केलेल्या गोलच्या आधारे उरुग्वेला विजय मिळवून दिला. अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेरपर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली.

पण अखेरच्या 10 मिनिटांत पूर्ण सामना फिरला.गॉडीन गोल केला आणि ज्या विजयाची चाहते वाट पाहत होते तो क्षण सत्यात उतरला. मात्र या अगोदर गोल करण्यासाठी दोन्ही संघाच्या स्टार्स खेळाडूंनी शर्शीचे प्रयत्न केले पण भक्कम गोलरक्षकामुळे गोल काही करुन होईनाच. यामुळे हताश झालेल्या उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेझ याने इटलीचा खेळाडू जॉर्जियो चिल्लिनी याच्या खांद्याचा चावाच घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुआरेझला रेड कार्ड दाखवून बाहेर काढण्यात आलं. आता ड गटात उरुग्वे दुसर्‍या क्रमांकावर आहे.

First Published: Jun 25, 2014 02:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading