अखेर स्पेनने लाज राखली

अखेर स्पेनने लाज राखली

  • Share this:

spain_vs_aus24 जून : सलग दोन पराभवानंतर अखेर वर्ल्ड चॅम्पियन स्पेननं लाज राखली. ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या दोन्ही मॅचमध्ये स्पेनला पराभवाचा दणका बसला होता. पण अखेर शेवटच्या मॅचमध्ये त्यांनी नवख्या ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं पराभव करत शेवट गोड केला.

आपल्या पहिल्याच मॅचमध्ये डेव्हिड विलानs गोल करत स्पेनचं खातं उघडलं. त्यानंतर 69 व्या मिनिटांला टोरेसनं गोल करत ही आघाडी वाढवली. तर माटानं स्पेनसाठी शेवट गोड केला पण हा विजय जरी स्पेननं मिळवला असला तरी या विजयाबरोबर मॉडर्न फुटबॉलमधील एका पर्वाचा अस्त झालाय.

First published: June 24, 2014, 7:42 PM IST

ताज्या बातम्या