न्येमार दे मार, ब्राझीलचा कॅमेरुनवर 4-1 ने विजय

  • Share this:

winbrazhil234224 जून : फिफा वर्ल्ड कपमध्ये यजमान ब्राझीलने पुढच्या फेरीत धडक मारली आहे. इतकच नाही तर त्यांनी आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानंही पटकावलंय. ग्रुप स्टेजमधील शेवटच्या मॅचमध्ये ब्राझीलने कॅमेरुनचा 4-1 असा धुव्वा उडवला. ब्राझीलचा स्टार प्लेअर न्येमारनं 4 गोल करत आपला धडाका पुन्हा एकदा दाखवून दिला. 17 व्या मिनिटाला न्येमारनं ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. पण तीनचं मिनीटांत जोएल मॅटिपनं गोल करत कॅमेरुनसाठी बरोबरी साधली. पण त्यानंतर पुन्हा एकदा न्येमार, फ्रेड आणि फर्नांडिन्होनं गोल करत ब्राझीलला हा दणदणीत विजय मिळवून दिला. आता शनिवारी बेलो हॉरिझांटेवर ग्रुप बी मधील दुसर्‍या क्रमांकाच्या चिलीशी ब्राझीलची मॅच रंगेल.

First published: June 24, 2014, 7:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading