अखेर मराठा आणि मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2014 05:40 PM IST

3maratha_aarakashan24 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने घोषणांचा धडाका लावलाय. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.

 

मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचं राज्य सरकारनं निश्चित केलंय. सामाजिक न्याय विभागाच्या प्रस्तावानुसार शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला 8 ते 12 टक्के ओबीसीचं स्वतंत्र आरक्षण तर मुस्लीमांना 4.5 टक्के आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

या प्रस्तावावर येत्या बुधवारी राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याआधी नारायण राणे समितीने मराठा समाजाला 20 टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली होती. पण घटना आणि कायद्याच्या चौकटीचा विचार करून मराठा समाजाला 8 ते 12 टक्क्यांपर्यंत आरक्षण देता येईल असा निष्कर्ष सचिव स्तरावर काढण्यात आला. या निष्कर्षाच्या आधारेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2014 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...