क्रोएशिया आणि मेक्सिकोसाठी करो या मरोचा सामना

क्रोएशिया आणि मेक्सिकोसाठी करो या मरोचा सामना

  • Share this:

croatia vs mexico23 जून : फिफा वर्ल्डकपमध्ये आजच्या चौथ्या मॅचमध्ये ग्रुप एमधील दोन टीमसाठी करो या मरोचा मुकाबला रंगेल. आज रेसिफमधील अरिना पेरॅन्बुकोवर क्रोएशिया आणि मेक्सिकोदरम्यान भारतीय वेळेनुसार रात्री 1.30 वाजता ही मॅच रंगेल. क्रोएशियासाठी ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. जर त्यांना नॉकआऊट स्पर्धेत जायचं असेल तर त्यांना ही मॅच जिंकावीच लागेल.

कारण मेक्सिकोपेक्षा ते एका पॉईंटनं मागे आहेत. या मॅचमध्ये ड्रॉ झाला तरीही मेक्सिको पुढच्या फेरीत जाईल. दोन्ही टीम्सनं याअगोदर चांगली खेळ केलाय. ब्राझीलकडून क्रोएशियाचा पराभव झाला होता. पण त्यांनी कॅमेरुनचा 4-0 नं धुव्वा उडवला होता. मेक्सिकोने कॅमेरुनचा 1-0 नं पराभव केला आहे. पण त्यांनी ब्राझीलशी बरोबरी केली होती. त्यामुळे आजची मॅच जिंकत कोण आपलं स्पर्धेतलं आव्हान कायम ठेवतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

First published: June 23, 2014, 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading