बलाढ्य ब्राझीलशी कॅमेरुनचा मुकाबला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2014 10:17 PM IST

बलाढ्य ब्राझीलशी कॅमेरुनचा मुकाबला

43neymar_23 जून : फिफा वर्ल्डकपमध्ये यजमान ब्राझील आणि कॅमेरुन भिडणार आहे. ग्रुप ए मधील ब्राझीलला आणि कॅमेरुनमध्ये लढत आहे. ब्राझिलियाच्या स्टेडियो नॅशनलवर भारतीय वेळेनुसार रात्री 1.30 वाजता ही मॅच रंगेल. ब्राझीलच्या खात्यात अगोदरच 4 पॉईंट्सची नोंद आहे. पण तरीही त्यांची कामगिरी तितकी चांगली झाली नाही. मेक्सिकोविरुद्धच्या मॅचममध्ये ब्राझीलचा आक्रमण तितका चांगला झाला नव्हता.

 

पण या मॅचमध्येही ब्राझीलची मदार स्टार प्लेअर नेयमारवर असणार आहे. नेयमार आज काय धडाका करतो, हे बघावं लागणार आहे. तर कॅमेरुनच्या टीमला या स्पर्धेत चांगला खेळ करता आला नाही. त्यानी त्यांच्या दोन्ही मॅच गमावल्या आहेत. त्यामुळे त्यांचं आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे ब्राझील आज 3 पॉईंट्स मिळवत ग्रुपमध्ये पहिल्या नंबरवर राहते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...