गोलचा बादशहा होण्यास आणखी 'क्लोज'

गोलचा बादशहा होण्यास आणखी 'क्लोज'

  • Share this:

65germany miroslav klose 201423 जून : ब्राझील वर्ल्ड कप अनेक गोष्टींसाठी संस्मरणीय ठरणार आहे. काही अप्रतिम मॅच आपल्याला बघायला मिळत आहे तर काही धक्कादायक निकालंही येतायत. कधी गोल्सचा धडाका बघायला मिळतोय तर कधी आपले आवडते स्टार्स फ्लॉप ठरतायत. पण या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये ज्या प्लेअरकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्यानं मात्र कोणालाही निराश केलं नाही.

जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजनं वर्ल्ड कपमधील सर्वाधिक गोल्सच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. वर्ल्ड कपमध्ये यापूर्वी ब्राझीलच्या रोनाल्डोच्या नावावर हा रेकॉर्ड होता. त्यानं 15 गोल्स केले होते. या वर्ल्ड कपपूर्वी क्लोजच्या खात्यात 14 गोल्स होते. जर्मनीच्या पहिल्या मॅचमध्ये क्लोजला खेळायची संधी मिळाली नाही. पण ती कसर त्यानं घानाविरुद्धच्या मॅचमध्ये भरुन काढली.

घाना विरुद्धच्या मॅचमध्ये क्लोजनं निर्णायक गोल केला आणि टीमला ड्रॉ करन दिला आहे. या गोलबरोबरच क्लोजनं रोनाल्डोच्या 15 गोल्सशी बरोबरी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेत आणखी एक गोल करत तो एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड करतो का हे बघणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.

क्लोजचा धडाका

एकूण गोल - 15

2002 जपान / कोरिया वर्ल्ड कप - 5 गोल

2006 जर्मनी वर्ल्ड कप - 5 गोल

2010 द. आफ्रिका वर्ल्ड कप - 4 गोल

2014 ब्राझील वर्ल्ड कप - 1 गोल

- वर्ल्ड कपचे टॉप स्कोरर्स

मिरोस्लाव क्लोज (जर्मनी)

- 15 गोल्स

- 2002, 2006, 2010, 2014

रोनाल्डो (ब्राझील)

- 15 गोल्स

- 1994, 1998, 2002, 2006

जर्ड म्युलर (जर्मनी)

- 14 गोल्स

- 1970, 1974

जस्ट फाँटेन (फ्रान्स)

- 13 गोल्स

- 1958

पेले (ब्राझील)

- 12 गोल्स

- 1958, 1962, 1966, 1970

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2014 09:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading