चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली

चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली

  • Share this:

we3chandrakant_gudevar_solapur23 जून : सोलापूरचे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अखेर बदली झालीय. आता त्यांच्या जागी मालेगावचे आयुक्त अजित जाधव इथे बदली होऊन येणार आहेत. त्यांनी 4 वर्षांपूर्वी सोलापूरचे उपायुक्त म्हणून काम पाहिलं होतं. यासंदर्भात चंद्रकांत गुडेवारांनी सरकारी आदेशाचं पालन करण्याची प्रतिक्रिया आयबीएन लोकमतला दिलीय. त्यांच्या बदलीविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहे. ही बदली रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. गुडेवारांच्या बदलीविरोधात सोमवारी संध्याकाळी सोलापूर महापालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचं सीपीआयएमचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितलंय.

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची सोलापुरातली कारकीर्द

  • 4 जुलै 2013 ला स्वीकारला पदभार
  • मनपाच्या अधिकार्‍यांना संपत्ती जाहीर करायला लावली
  • अवैध बांधकामांवर कारवाई, नगरसेवक आणि नेत्यांचीही बेकायदेशीर बांधकामं पाडली
  • शहर डिजीटलमुक्त केलं, बड्या नेत्यांच्या फ्लेक्स जाहिराती जेसीबी लावून पाडल्या
  • 26 कामचुकार कर्मचारी निलंबित,20 जणांना पाठवलं घरी
  • टेंडर फुगवून लूट करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं उदा. शेठ मसुरीलालसाऱख्या कंपनीला काळ्या यादीत टाकलं
  • कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली न येता काम
  • भ्रष्टाचार कमी केल्यानं अनेक नगरसेवक गुडेवारांवर होते नाराज

First published: June 23, 2014, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading