दरवाढीविरोधात काँग्रेसने उपसले आंदोलनाचे हत्यार

दरवाढीविरोधात काँग्रेसने उपसले आंदोलनाचे हत्यार

  • Share this:

5congress_protest21 जून : मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात केलेल्या दरवाढीच्या विरोधात विरोधक रस्त्यावर इतरले आहे. या भाडेवाढीबद्दल लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ही भाडेवाढ मागे घ्यावी यासाठी विरोधकांनीही दबाव वाढवायला सुरुवात केलीये. या रेल्वे भाडेवाढी विरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे सर्व नेते सोमवारी सीएसटी ते ठाणे विनातिकीट प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन करणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.

मुंबईत काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांच्या नेतृत्त्वाखाली घाटकोपर रेल्वे स्टेशनसमोर काँग्रेसनं धरणं आंदोलन केलं. तर राष्ट्रवादीनंही रेल्वे दरवाढीवर टीका केली आहे. दरवाढीविरोधात मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाववाढ मागे घ्या, अशी मागणी करत आंदोलन केलं.

तर ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्रिसरात राष्ट्रवादीने लोकलवर चढून आंदोलन केलं आणि दरवाढ मागे घेण्यासाठी स्टेशन मास्तरांना निवेदन दिलं. 25 जूनपर्यंत दरवाढ मागे न घेतल्यास रेलरोकोचाही राष्ट्रवादीने इशारा दिला.दरम्यान, मुंबईच्या डबेवाल्यांनीही भाववाढीचा निषेध करत निदर्शनं केली. पण भाजप आणि केंद्र सरकारनं मात्र निर्णयाचं समर्थनं केलं असून यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2014 09:09 PM IST

ताज्या बातम्या