कदमांच्या समर्थकांकडून युवा आघाडीच्या अध्यक्षांना मारहाण -शेट्टी

कदमांच्या समर्थकांकडून युवा आघाडीच्या अध्यक्षांना मारहाण -शेट्टी

  • Share this:

raju_shetty_on_kadam21 जून : सांगली जिल्ह्यातील पलूस इथल्या आमसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांना मारहाण करण्यात आलीय. ही मारहाण वनमंत्री पतंगराव कदम यांच्या समर्थकांनी केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय.

 संदीप राजोबा यांना उपचारासाठी सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या आमसभेत पलूसमध्ये वनमंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सुरूवात झाल्यानंतर गटविकास अधिकारी अडसूळ यांनी सभेचं वाचन सुरू केलं. त्यावेळी व्यासपीठावर बसलेले शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांनी मागील सभेच्या ठरावांबद्दल आणि ऊस दरांबद्दल प्रश्न विचारला.

पण पंचायत समितीच्या आमसभेत ऊस दराचा काय संबंध असा सवाल करत पतंगराव समर्थकांनी वादावादी सुरू केली. संदीप राजोबा यांनी ज्या साखर कारखानदारांनी एफआरपीनुसार ऊसदर दिला त्यांच्यावर फौजदारी कारवाई का केली नाही असा सवाल केला.

त्यावेळी संतप्त कदम समर्थकांनी संदीप राजोबा यांना यावेळी मारहाण केली. जखमी राजोबा यांना सांगलीतल्या सरकारी हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पतंगराव कदम यांच्या घरावर दगडफेक केली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2014 06:20 PM IST

ताज्या बातम्या