...तर वारकर्‍यांना पंढरीत येण्यापासून का रोखू नये ?: कोर्ट

...तर वारकर्‍यांना पंढरीत येण्यापासून का रोखू नये ?: कोर्ट

  • Share this:

pandharpur_toilets_issiue21 जून : अपुरी शौचालयं, उघड्यावर होणारे नैसर्गिक विधी आणि चंद्रभागेचं प्रदूषण..वारीच्या तोंडावर या समस्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वारीसाठी येणार्‍या लाखो भाविकांची व्यवस्था होत नसेल त्यांना पंढरपुरात येण्यापासून का रोखण्यात येऊ नये असा प्रश्न न्यायालयाने विचारलाय. तसंच पालख्या दाखल होण्यापूर्वी सरकारने चार हजार फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

पंढरीत भरणार्‍या चार मोठ्या वार्‍या आणि त्यांना पुरविण्यात येणारी अपुरी सेवा सुविधा याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी लक्ष वेधलंय. त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने प्रशासनावर कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढल.

वारीसाठी येणार्‍या लाखो भाविकांची व्यवस्था होत नसेल त्यांना पंढरपुरात येण्यापासून का रोखण्यात येऊ नये असा प्रश्न विचारलाय. राज्य सरकार, नगरपालिका आणि मंदिर समिती एकमेकांकडे बोट दाखवतंय. या परिस्थितीत आता न्यायालयाने 9 जुलैेपुर्वी पंढरीत पालख्या दाखल होण्यापूर्वी सरकारने चार हजार फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2014 12:08 PM IST

ताज्या बातम्या