कॅम्पा कोलाच्या रहिवाशांविरोधात FIR दाखल

कॅम्पा कोलाच्या रहिवाशांविरोधात FIR दाखल

  • Share this:

f3campacoala21 जून : मुंबईतील वरळी येथील वादग्रस्त कॅम्पा कोला कम्पाऊंडवर कारवाई करण्यासाठी मुंबई पालिकेनं बाह्यावर सरसावल्या आहेत. आज दुसर्‍यादिवशी कॅम्पा कोलावरच्या कारवाईसंदर्भात पोलीस आणि पालिका अधिकार्‍यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर कॅम्पाकोला वासियांची आज समजूत घातली जाणार आहे. ते कॅम्पाकोला कम्पाऊंडमध्ये पोहोचले आहेत.

आजही पोलीस बळाचा वापर करणार नाही, यावर पालिका अधिकारी ठाम आहेत. या परिसरातला पोलीस बंदोबस्त हटवण्यात आलाय. त्यामुळे आज कारवाई होणार नाही अशी चर्चा होती. दरम्यान, सरकारी कामात हस्तक्षेप, बेकायदेशीर वर्तन केल्यामुळे कॅम्पाकोला वासियांविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

First published: June 21, 2014, 12:29 PM IST

ताज्या बातम्या