विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व मी करावं, अशी काँग्रेसची इच्छा -पवार

  • Share this:

pawarnew20 जून : राज्यात नेतृत्व बदल होऊ शकतो असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. पण राष्ट्रवादीने तशी मागणी केली नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझ्या नेतृत्वात लढावी, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. पण आपण स्वत:ला मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

त्याऐवजी आपण प्रचाराची धुरा सांभाळू अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांसमोर मांडल्याचं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसने जर का नेतृत्वबदल केला तर राष्ट्रवादीकडूनही मंत्रिमंडळात बदल केले

जातील. पक्षसंघटनेत आम्हाला मोठे फेरबदल करायचे आहेत, असं पवारांनी स्पष्ट केलं.

First published: June 20, 2014, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading