इराकमधून अपह्रत 40 भारतीयांपैकी एकाची सुटका

इराकमधून अपह्रत 40 भारतीयांपैकी एकाची सुटका

  • Share this:

Iraq-Jihadist-flag_2947305b20  जून :  इराकमधून अपह्रत 40 भारतीयांपैकी एकाची सुटका करण्यात आली आहे. मोसुलमध्ये आयसीसच्या दहशतवाद्यांनी या चाळीस भारतीयांचं अपहरण केलं होतं. त्या पैकी एकाची सुटका होऊन तो भारतीय अधिकार्‍यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. अपहरण झालेले बहुतांशी भारतीय 'तारिक उर अलहूद' या कंपनीत काम करणारे पंजाबचे कामगार आहेत.

इराकमध्ये 40 भारतीय नागरीकांचं अपहरण झालं असून त्यांचा आता ठावठिकाणा सापडला आहे. पण त्यांना आता लगेच परत आणू शकत नाही. इराकमधली परिस्थिती सध्या तशी नाही, असं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी असं सांगितल.

तर दुसरीकडे इराकमधली परिस्थिती आणखी चिघळली आहे. तिथे रासायनिक अस्त्र ठेवलेल्या इमारतीवर दहशतवाद्यांनी ताबा मिळवला आहे. इराक आणि आजूबाजूच्या देशांसाठी ही बाब अतिशय गंभीर मानली जात आहे. यामुळे इराकच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, इराकमध्ये पुन्हा सैन्य पाठवण्यास अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नकार दिलाय. मात्र, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी इराकला मर्यादित स्वरुपात मदत करायला तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. इराकनं अमेरिकेकडे मदतीची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2014 11:31 AM IST

ताज्या बातम्या