इंग्लडला धक्का, उरुग्वेचा 2-1 दणदणीत विजय

इंग्लडला धक्का, उरुग्वेचा 2-1 दणदणीत विजय

  • Share this:

suarez_celbarte20  जून : फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला उरुग्वेनं जबरदस्त धक्का दिला आहे. उरुग्वेने इंग्लंडचा 2-1 ने पराभव केला. या पराभवामुळे नॉकआऊटमध्ये जाण्याच्या इंग्लंडच्या आशा धूसर झाल्या आहेत.

उरुग्वेच्या लुईस सॉरेझनं फिटनेसच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत 2 गोल करून उरुग्वेला धडाकेबाज विजय मिळवून दिला. मॅच सुरू झाल्यानंतर 39व्या मिनिटाला लुईसने पहिला गोल केला. 75व्या मिनिटाला इंग्लंडनं बरोबरी साधली पण मॅच संपायला 5 मिनिटं बाकी असताना लुईसने आणखी एक गोल करून उरुग्वेला विजय मिळवून दिला.

First published: June 20, 2014, 9:45 AM IST

ताज्या बातम्या