19 जून : मुंबईतील वरळी येथील कॅम्पा कोला कम्पाऊंडवर अनधिकृत मजल्यांवर हातोडा पडणार हे आता स्पष्ट झालंय. कॅम्पा कोलावरील कारवाईसाठी दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. कॅम्पा कोलावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस आता कामाला लागले आहेत.
इमारतीच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. याचाच अर्थ, कारवाई लवकरच होणार याचे पोलिसांकडून संकेत मिळाले आहेत. कॅम्पाकोलाच्या 102 अनधिकृत फ्लॅट्सवर कारवाई होणार आहे. कॅम्पाकोलाच्या पाचव्या मजल्याच्यावरील हे फ्लॅट्स आहेत. एकूण सात इमारतींमध्ये हे फ्लॅट्स आहेत.
Follow @ibnlokmattv |