महायुतीशी चर्चा करुनच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार -उद्धव ठाकरे

  • Share this:

udhav3319 जून : 'महायुतीत चर्चा करून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेऊ असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.आताच मुख्यमंत्री पदाबाबत विचार केलेला नाहीय असंही त्यांनी म्हटलंय.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा सोहळा मुंबईत पार पडला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी 'थोडं थांबा' असे संकेत दिले.

मात्र कालपर्यंत शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचं जाहीरपणे सांगितलं. एवढेच नाहीतर वर्धापन दिनाच्या सोहळ्यातही मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल आणि ते उद्धव ठाकरेच असतील असा सूर सेनेच्या नेत्यांनी लगावला.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण हवा यापेक्षा तो शिवसेनेचाच हवा, असं मत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलंय.तर सेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून महाराष्ट्रात शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार असं वचन देण्यात आलंय. दरम्यान, शिवसेनेनं आज आपला वचननामा प्रसिद्ध केलाय.

शिवसेनेचा वचननामा

  • - महाराष्ट्राला नंबर एकचं राज्य बनवणार
  • - राज्यातली पाणीटंचाई दूर करणार
  • - मुंबईत कोस्टल हायवे बनवणार
  • - एलिव्हेटेड रेल्वे मार्ग बनवणार
  • - नाशिकला आध्यात्मिक हब बनवणार
  • - पुण्याला शैक्षणिक तर नागपूरला वाहतूक हब बनवणार
  • - कोल्हापूरला कृषी तर सोलापूरला टेक्स्टाईल हब बनवणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2014 08:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading