स्पेन वर्ल्ड कपबाहेर

स्पेन वर्ल्ड कपबाहेर

  • Share this:

goal_past_casillas19  जून : फिफा वर्ल्ड कपमधला आतापर्यंतचा सगळ्यात धक्कादायक निकाल लागला आहे. गतविजेता स्पेन फिफा वर्ल्ड कपबाहेर पडली आहे. रंगतदार मॅचमध्ये चिलीने स्पेनचा 2-0ने पराभव केला.

स्पेनसाठी ही शेवटची संधी होती पण ग्रुप स्टेजमधल्या या सलग दुसर्‍या पराभवामुळे स्पेनची टीम स्पर्धेबाहेर फेकली गेली आहे. चिलीने मॅचच्या 19व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला तर हाफटाइमच्या आधी स्पेनच्या कॅसिलासच्या ढिसाळ गोलकिपिंगचा फायदा घेत ऍरनग्विझने दुसरा गोल केला आणि स्पेनच्या चाहत्यांना हादरा देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसर्‍या हाफमध्ये स्पेनने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही. या विजयामुळे चिलीची नॉकआऊट राऊंडमधली जागा नक्की झाली आहे.

First published: June 19, 2014, 10:16 AM IST

ताज्या बातम्या