तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान

तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान

  • Share this:

tukaram palkhi19  जून : तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. जवळपास 4 लाख वारकरी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारकरी आणि भाविकांसाठी चोख व्यवस्था केली आहे. देहूमध्ये सध्या सगळीकडे भक्तीमय वातावरण आहे. आज दुपारी चार वाजता हरिभक्तांची मांदियाळी देहूतून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवेल. त्यासाठी देहूत राज्यभरातून दिंड्या दाखल झाल्यायत तर सुरक्षिततेसाठी 530 पोलीस बंदोबस्तासाठी हजर आहेत.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातल्या संत नामदेव महाराजांच्या दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं आहे. सुमारे 20 दिवसांचा प्रवास करून ही पालखी पंढरपुरात पोहोचेल. या दिंडीमध्ये जवळपास 200 वारकर्‍यांचा सहभाग आहे. ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकर्‍यांचं स्वागत करत त्यांना दरवर्षीप्रमाणे अन्नदान करते. अंबाजोगाईत होणार्‍या श्रींच्या गोल रिंगणावेळी या दिंडीची विशेष उपस्थिती असते. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि नामदेव महाराजांच्या पालख्यांची जेव्हा भेट होते त्यावेळी या भेटीचा आनंदही वेगळा असतो. पण इतर दिंड्यांच्या तुलनेत या दिंडीला पाहिजे तेवढ्या सुविधा मिळत नाहीत अशी या दिंडीतील वारकर्‍यांची तक्रार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2014 10:12 AM IST

ताज्या बातम्या