सेना-भाजपमध्ये जागावाटपावरुन जुंपली

सेना-भाजपमध्ये जागावाटपावरुन जुंपली

  • Share this:

udhav fadnavis18 जून : लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर विधानसभेसाठी मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन चांगलीच जुंपलीय. दोन्ही पक्षांनी जास्त जागांवर दावा सुरू केलाय.

शिवसेना भाजपाच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलात कुठलाही बदल होणार नाही. शिवसेना फारफार तर काही जागा आदलाबदल होण्यावर विचार होऊ शकेल असं शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी स्पष्ट केलंय. काही जागा वाढवून मिळाव्यात यासाठी भाजप शिवसेनेवर दबाव वाढवत आहे.

दरम्यान, आतापर्यंत ज्या पक्षाला जास्त जागा मिळाल्यात, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होत आला आहे पण यंदाच्या निवडणुकीत एकाच पक्षाला जास्त जागा मिळतील असा विश्वास शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. तसंच शिवसेनेकडून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

तर आमच्यात जागावाटपाची अजून कोणतीही चर्चा झाली नाही, त्यामुळे हवेत गोळीबार करू नका असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. दरम्यान, उद्धव ठाकरे उद्या (गुरुवारी) राज्यातल्या 288 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. शिवसेना जर निवडणूक एकट्यानं लढली, तर किती मतदारसंघात ताकदीचे उमेदवार आहेत याची चाचपणीही उद्धव करणार असल्याचं समजतंय.

 उद्धव ठाकरेंचा काय कार्यक्रम आहे?

- शिवसेना स्वतंत्र लढल्यास किती मतदारसंघात ताकदीचे उमेदवार आहेत? याची चाचपणी

- 288 मतदारसंघाचे बूथ मेंबर नोंदणी

- 288 मतदारसंघांत गाव तिथे शिवसेना

- विशेषत: पूर्व विदर्भावर लक्ष देणार

- राज्यातल्या 6 महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या शहरात स्वतंत्र सभा घेणार

- शिवबंधन गावपातळीपर्यंत नेणार

- शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचं सर्वेक्षण व्हावं, यासाठी 10 लाख सह्यांची मोहीम

- गड-किल्ल्यांना केंद्राने निधी द्यावा, यासाठी पंतप्रधानांना 10 लाख सह्यांचं निवेदन देणार

First published: June 18, 2014, 11:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading