मुंबई : पोलीस भरतीत आणखी एकाचा मृत्यू

मुंबई : पोलीस भरतीत आणखी एकाचा मृत्यू

  • Share this:

police bharti1

18 जून : मुंबईच्या पोलीस भरतीत आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. बीडच्या गहिनीनाथ लटपटेचा उपचारांदरम्यान मुलुंडच्या प्लॅटीनम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गहिनीनाथच्या मृत्यूमुळे भरती परीक्षेदरम्यान मृत्यू झालेल्या उमेदवारांची संख्या 5वर पोहोचलीय. गहिनीनाथ विक्रोळीतल्या पोलीस भरती परीक्षेदरम्यान बेशुद्ध झाला होता. त्याला उपचारासाठी मुलुंडच्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दाखल केल्यापासून तो बेशुद्धच होता आणि काल त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आपण विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असून फौजदारी कारवाईची मागणीही करणार असल्याचं भाजप खासदार किरीट सोमैया यांनी IBN लोकमतला सांगितलं.

पोलीस भरतीदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. पण, मालेगावचा अंबादास सोनावणे या मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना 9 दिवसांनंतरही मदत मिळालेली नाही. जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाच्या एकाही अधिकार्‍याने सोनावणे कुटुंबीयांची भेटही घेतलेली नाही. अंबादासच्या पत्नीला नोकरी द्यावी, अशी मागणी अंबादासचे कुटुंबीय करताहेत.

अंबादास 9 जून रोजी मुंबईला पोलीस भरतीसाठी आला होता. भरती प्रक्रियेदरम्यान त्याचा दुदैर्वी मृत्यू ओढवला. अंबादास प्रमाणेच इतर चार तरुणांच्या कुटुंबीयांनाही राज्य सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पण, त्यांनाही मदत मिळालेली नाही.

First published: June 18, 2014, 1:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading