बेल्जियमची मुसंडी ; रशिया-कोरियामध्ये 'फिफ्टी फिफ्टी' !

बेल्जियमची मुसंडी ; रशिया-कोरियामध्ये 'फिफ्टी फिफ्टी' !

  • Share this:

vertaoghen_penalty18  जून : फुटबॉलची पंढरी ब्राझीलमध्ये फिफा वर्ल्डकपची धूम सुरू आहे. मंगळवारी झालेल्या तीन अटीतटीच्या लढतीचा फुटबॉलप्रेमींनी 'याचे देही याचा डोळा' अनुभव घेतला. बलाढ्य ब्राझील आणि मेक्सिकोची मॅच ड्रा झाली पण त्याअगोदर झाल्याले बेल्जियम आणि अल्जिरियाच्या मॅचने चांगलीच रंगत आणली.

बेल्जियमने पिछाडीवरुन मुसंडी मारत अल्जिरियावर 2-1 ने मात केली. 25व्या मिनिटाला अल्जिरियाने पेनल्टीवर गोल केला. पण बेल्जियमने सेकंड हाफमध्ये आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून मॅच 2-1 ने जिंकली.

तर दुसरीकडे युरोप खंडातील कट्टर प्रतिस्पर्धी रशिया आणि साऊथ कोरिया एकमेकांना भिडले. 'काटे की टक्कर' अशी झालेली ही मॅच मात्र 1-1 ने बरोबरीत सुटली. फर्स्ट हाफवर वर्चस्व कोरियन्सचं होतं पण नंतर रशियन टीम आक्रमक खेळी करुन बरोबरी साधली. अखेर हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

आपण एक नजर टाकूया सध्याच्या टॉप गोल स्कोरर्सवर

गोल मीटर

  • थॉमस म्युलर (जर्मनी)

- 3 गोल

  • न्येमार (ब्राझील)

- 2 गोल

  • करिम बेंझिमा (फ्रान्स)

- 2 गोल

  • आर्जेन रॉबीन (हॉलंड)

- 2 गोल

  • रॉबीन व्हॅन पर्सी (हॉलंड)

- 2 गोल

  • लायोनेल मेस्सी (अर्जेंटिना)

- 1 गोल

First Published: Jun 18, 2014 09:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading